बारावी पुरवणी परीक्षेचा अर्ज १८ जून पर्यंतची मुदतवाढ
मुंब,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। बारावी परीक्षेचा निकाल मागील महिन्यात जाहीर करण्यात आला आहे. पण ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेत कमी गुण मिळाले आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी गेल्या काही वर्षांपासून पुरवणी परीक्षा घेण्यात येत आहे. यंदाच्या वर्षी घेण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षांना १८ जुलैपासून सुरूवात होणार आहे.
१८ जुलैपासून सुरु होणाऱ्या पुरवणी परीक्षांसाठी २९ मे ते ९ जूनपर्यंत अर्ज मागवण्यात आले होते. परंतु यंदाच्या वर्षी फारशा विद्यार्थ्यांनी अर्ज न केल्याने या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या तारखांमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे या पुरवणी परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना १८ जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यामुळे १८ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
बारावीची पुरवणी परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने http://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर १८ जूनपर्यंत विलंब शुल्क भरून अर्ज करता येणार आहे. या पुरवणी परीक्षेसाठी अनुत्तीर्ण विद्यार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन पुनर्परीक्षा देणारे विद्यार्थी, आयटीआय विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे .
‘या परीक्षेसाठी केवळ ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज स्वीकारले जात आहेत. फेब्रुवारी-मार्च २०२३ परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या परीक्षेतील माहिती ऑनलाइन अर्जामध्ये समाविष्ट करता येणार आहे. श्रेणी सुधार करू इच्छिणाऱ्या फेब्रुवारी-मार्च २०२३ मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्ट २०२३ आणि मार्च २०२४ अशा लागोपाठ दोनच संधी उपलब्ध असतील,’ असे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांच्याकडून सांगण्यात आले आहे. बारावीची पुरवणी परीक्षा ही पुन्हा परीक्षा देणार्यांसाठी, खाजगी विद्यार्थ्यांसाठी, क्लास इम्प्रुव्ह साठी आयटीआयचे क्रेडिट ट्रांसफर करण्यासाठी आयोजित केलेली असते. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वाया जात नाही. १२ वीच्या परीक्षेत नापास झालेल्या किंवा कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा घेण्यात येते.