भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराष्ट्रीयसामाजिक

…अशा पद्धतीनं केलेला विवाह कायद्याने वैध नाही ! उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल

मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क। जबरदस्तीने कपाळावर कुंकू लावून किंवा भांगात कुंकू भरून विवाह होत नाही. विवाह होण्यासाठी पूर्ण प्रक्रिया पार पाडावी लागते. कोणाही तरुणीच्या इच्छेविरुद्ध तिच्या भांगात कुंकू लावता येत नाही. असं केल्यावर लग्न झालं असं कोणी मानत असल्यास तसं नाही. असा विवाह कायद्याने वैध मानला जात नाही, असं विवाहाशी संबंधित असलेल्या एका खटल्यात पाटणा हायकोर्टाने एक महत्त्वपूर्ण निकाल देत स्पष्ट केलं .

पाटणा हायकोर्टाने सांगितलं आहे, की हिंदू धर्मात नवदाम्पत्याने यज्ञाभोवती मारलेल्या सात फेऱ्या महत्त्वाच्या मानल्या जातात. त्यानंतर कुंकू लावण्याचा विधी होतो. त्या वेळी वधूच्या भांगात आणि कपाळावर कुंकू लावल्यानंतर विवाह वैध मानला जातो; मात्र कोणी बाकीचे विधी न करता जबरदस्तीने केवळ भांगात किंवा कपाळावर कुंकू लावून विवाह करण्याचा प्रयत्न करत असेल, तर तो विवाह वैध मानला जात नाही.

न्यायाधीश पी. बी. बजंथरी आणि अरुणकुमार झा यांच्या खंडपीठाने सांगितलं, की वराने स्वतःच्या इच्छेने वधूच्या भांगात कुंकू लावलं पाहिजे. 10 नोव्हेंबरला पाटणा हायकोर्टाने हा निकाल दिला. कोर्टाने असं स्पष्ट सांगितलं, की सात फेऱ्यांशिवाय हा विवाह अवैध मानला जाईल.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!