औरंगाबादच्या नामांतरावर उद्या शिक्कामोर्तब – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। महाविकास आघाडीचे त्यांनी तातडीने मंत्रिमंडळ बैठक बोलावून २००-३०० निर्णय घेतले. मात्र, ही बैठक अनधिकृत होती. सरकार अल्पमतात असताना कॅबिनेट घेऊ शकत नाही. त्यावेळी आम्ही बुहमतासाठी राज्यपालांना पत्रही लिहिलं होतं. त्यामुळे या कॅबिनेटमध्ये घेतलेले निर्णय बेकायदेशीर आहेत. उद्या मंत्रिमंडळ बैठक घेऊन आम्ही काही निर्णय घेणार आहोत. निर्णयांवर शिक्कामोर्तब करणार आहोत. औरंगाबाद, उस्मानाबाद यांचे नामांतराच्या निर्णयावर उद्या शिक्कामोर्तब करू, असं एकनाथ शिंदे म्हणाले. ते आज अब्दुल सत्तारांनी मुंबईच्या रविंद्र नाट्य मंदिरात आयोजित केलेल्या सत्कार समारंभात बोलत होते.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ बैठक घेऊन औरंगाबादचे नामकरण करून संभाजीनगर करण्यात आले होते. तसेच, उस्मानाबादचे नाव बदलून धाराशीव करण्यात आले होते. तर, नवी मुंबईच्या विमानतळाला दि.बा. पाटील यांच्या नावालाही हिरवा कंदील देण्यात आला होता. याचप्रमाणे तब्बल ३०० जीआर काढण्यात आले होते. मात्र, हे जीआर अनधिकृत असून उद्या याबाबत बैठक घेऊन या निर्णयांवर शिक्कामोर्तब करणार आहोत.
ते पुढे म्हणाले की, औरंगाबादचं नाव संभाजीनगर करणारच आहोत. कारण, संभाजीनगर हे नाव बाळासाहेब ठाकरे यांच्या मुखातून आलेलं नाव आहे.