अयोध्येचं प्रभू श्रीराम मंदिर भाविकांसाठी ‘या’ महिन्यात खुले होणार
मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। देश-विदेशातील करोडो हिंदूचे श्राद्धास्थान असलेल्या अयोध्येच्या राममंदिराची प्रतीक्षा लागून राहिली आहे. ते अयोध्येतील राममंदिर पुढच्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात भाविकांसाठी खुलं होणार आहे. प्रभू श्री रामचंद्रजी यांचे अयोध्या येथे तयार होत असलेले भव्य राम मंदिर केव्हा पूर्ण होणार? भव्य राम मंदिरात प्रभू श्रीरामजींचे दर्शन केव्हा घेता येणार? याची आता रामभक्तांकडून वाट पाहिली जात आहे.
उत्तर प्रदेश सरकारने यासंदर्भात एका पत्रकात म्हटले आहे की, अयोध्येतील सहादतगंज ये नया घाटपर्यंतच्या १३ किमी लांबीच्या रामपथाचे बांधकामही प्रगतीपथावर आहे. रामजानकी पथ व भक्तिपथाच्या बांधणीची रुपरेषाही तयार आहे. अयोध्या रेल्वेस्थानक व विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. श्री राम जन्मभूमी येथील राममंदिर व हनुमानगढी येथील मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा प्रवास या रस्त्यांमुळे अधिक सुखकर होणार आहे.
कर्नाटकतील म्हैसूरहून आलेल्या दगडातून रामललाची मूर्ती तयार करण्यात येणार आहे. पाच वर्षांच्या बाळाच्या रुपात राम मंदिरात रामललाची मूर्ती स्थापन केली जाणार आहे. हातात धनुष्य आणि बाण असेल तर डोक्यावर मुकूट असणार आहे. इतकचं नाही तर राम मंदिर ट्रस्टचे वरिष्ठ सदस्य डॉक्टर अनिल मिश्रा यांनी सांगितलं की, राम भक्तांनी प्रभू रामचंद्रांची मूर्ती जिथे बसवण्यात येईल ते आसन सोन्याचे मढवण्यात यावं अशी इच्छा व्यक्त केली आहे. म्हणजेच तिथे प्रभू रामचंद्रांची मूर्ती असेल तेही सुवर्णजडीत असेल.
राम जन्मभूमी तिर्थक्षेत्र ट्रस्टचे वरिष्ठ सदस्य अनिल मिश्रा यांनी सांगितलं की, रामललाची मूर्ती तयार करण्यासाठी ट्रस्टचे खजिनदार गोविंद देव गिरी यांच्यासोबतची टीम युद्धपातळीवर तयारी करत आहे. वेळेत मूर्ती तयार होईल. २०२३ ऑक्टोबर ते नोव्हेंबरपर्यंत मूर्ती तयार करुन घेतली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.