पुन्हा पुढील तीन दिवस अवकाळीचा इशारा, राज्यात आजही पाऊस
मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क। राज्यातील काही भागात अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. दरम्यान, पुढील तीन दिवस विदर्भासह खान्देशात जोरदार पावसाची शक्यता ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे.
आजही राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. भुसावळमध्ये सलग तिसऱ्या दिवशीही मध्यरात्रीपासूनच जोरदार अवकाळी पाऊसाला सुरुवात झाली, तर 2 डिसेंबरपर्यंत नैऋत्य आणि लगतच्या आग्नेय बंगालच्या उपसागरात मिचांग हे चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्रातही पुढील 3 दिवस पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे.
आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलक्या पावसाचा आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, च्रंद्रपूर या जिल्ह्यांना हवामान विभागाने आज यलो अलर्ट दिला आहे
14 जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता
संपूर्ण विदर्भातील 11 आणि खान्देशातील नंदुरबार, धुळे आणि जळगांव अशा तीन जिल्ह्यासहित एकूण 14 जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मुंबईसह कोकण आणि मराठवाड्यासहीत उर्वरित महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यात मात्र ढगाळ वातावरणासहित अगदीच तूरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यताही कायम आहे.
माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर असे 7 जिल्हे वगळता महाराष्ट्रातील उर्वरित 29 जिल्ह्यात दुपारच्या कमाल तापमानात सरासरीपेक्षा 4 डिग्रीने कमालीची घसरण जाणवत आहे. तिथे दिवसाही चांगलाच गारवा जाणवू शकतो. विशेषतः विदर्भ मराठवाड्यात हा परिणाम अधिक जाणवेल अशी शक्यता माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, शनिवार दिनांक 2 डिसेंबरपासून वातावरण पूर्णपणे निवळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना अवकाळीचा मोठा फटका
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे. वर्षभर मेहनत करून तयार केलेली पीक अवकाळी पावसामुळे शेतातच कोलमडून पडली आहेत. त्यामुळे या शेतीवर उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्यांनी आता उदरनिर्वाह करायचा कसा असा प्रश्न उपस्थित केला. अनेक ठिकाणी फळबागांना देखील फटका बसला आहे. त्यामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. पृथ्वीचं वाढतं तापमान हे अवकाळी पावसाला कारणीभूत असल्याचे डख म्हणाले. भविष्यात अवकाळी पावसाला, गारपीटीला सामोर जावं लागणार आहे. हवेचं कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळं अशी स्थिती निर्माण होत आहे,