भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयमहाराष्ट्र

सिगारेट्सच्या सुट्या विक्रीवर बंदी, संसद समितीची शिफारस

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। केंद्र सरकारने लवकरच सिगारेट्सच्या सुट्या स्वरूपातील विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. सिगारेट्सचे शौकीन असणाऱ्यांच्या आता खिसाला चांगलाच चाट पडणार आहे

सिगारेटचे संपूर्ण पाकीट विकत घेण्याकरीता जादा पैसे खर्च करावे लागतात, म्हणून एकेक सिगारेट्स विक्रीचे प्रमाण खूपच जास्त आहे. त्यामुळे एकेक सिगारेट्स ऐवजी संपूर्ण पाकीट्स विक्रीचे बंधन लादल्यास सिगारेट्स विक्रीचे प्रमाण काही प्रमाणात तरी कमी होईल असे पार्लेमेटरी कमिटीचे म्हणणे आहे. पार्लमेंटची स्टँडींग कमिटीने सिगारेटच्या सुट्या स्वरूपातील विक्रीवर बंधी घालण्याची शिफारस केली आहे,या सिगारेट्सच्या विक्रीबाबतच्या निर्बंधांबाबत येत्या आर्थिक संकल्प २०२३-२४ आधी निर्णय येऊ शकतो असे सरकारचे म्हणणे आहे. एकेक स्वरूपात सिगारेट्सची विक्री किंवा निर्मिती अशा दोन्ही बाबींवर बंदीची शिफारस समितीने केली आहे.

केंद्रसरकारने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या शिफारसीवरून यापूर्वी २०१९ मध्ये ई- सिगारेट्सवर बंदी घातली आहे. पार्लेमेंटरी कमिटीने देशाच्या सर्व विमानतळावर स्माेकींग झाेन स्थापन करण्याचीही शिफारस केली आहे. जीएसटीच्या अमलबजावणीनंतरही केंद्र सरकारने तंबाकूजन्य वस्तूंच्यावर जास्त जीएसटी आकारला नसल्याकडेही कमिटीने दिशानिर्देश केले आहेत. तंबाकू आणि अल्काेहलच्या अतिसेवनाने कॅन्सरचा धाेका वाढत असल्याचे कमिटीने म्हटले आहे.तबांकूच्या विक्रीवर अंकुश आणण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!