या पन्नास वाघांमुळे भाजपच्या मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान, शिंदे शिवसेनेन काढली भाजपची औकात, वाद पेटणार?
मुंबई ,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। एकनाथ शिंदे वाघ, या पन्नास वाघांमुळे भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान आहे, अनिल बोंडे नी आत्मपरीक्षण करावं, अनिल बोंडे यांच्या टिकेवर शिंदे शिवसेनेने पलटवार केलाय.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दिलेल्या जाहिरातीवरून शिंदे गट आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. या जाहिरातीवरून भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला चढवल्यानंतर शिंदे गटाने भाजपची औकातच काढली आहे. या जाहिरातीवरून भाजपने नाराजी व्यक्त करत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच निशाणा साधला आहे.
तर दुसरीकडे शिंदे गटानेही भाजपला जसेच्या तसे उत्तर देत भाजप वर पलटवार केला आहे. भाजपकडून शिवसेनेच्या मतदारसंघात हस्तक्षेप करण्यात येत आहे. त्यावरूनही संजय गायकवाड यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय. शिवसेनेच्या मतदारसंघात हस्तक्षेप करणे थांबवा. तुम्ही कोणाच्या संगतीने मोठे झालात याचाही विचार करा. बाळासाहेब ठाकरेंचे बोट पकडून आपण मोठे झाला आहात. नाहीतर आपली काय औकात होते हे लक्षात ठेवले पाहिजे, असं म्हणत अनिल बोंडे यांनी बोलताना आत्मचिंतन करून बोलावं, असा सल्लाही संजय गायकवाड यांनी दिला. परंतु आता शिंदे शिवसेनेन भाजपची औकातच काढल्याने पेटणार का?