यंदाच्या वट पौर्णिमेवर भद्राचं सावट ; शुभ मुहूर्त केव्हा?
मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा । वट पौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रिया उपवास करतात आणि वट वृक्षाची पूजा करतात. यंदा 3 जून 2023 रोजी साजरी केली जाणार आहे.
हिंदू कॅलेंडरनुसार, वट पौर्णिमा व्रत जेष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला पाळली जाते. ज्येष्ठ पौर्णिमा तिथी 3 जून रोजी सकाळी 11:16 वाजता सुरू होणार असून आणि 4 जून रविवारी सकाळी 09:11 पर्यंत असणार आहे. यंदाच्या वट पौर्णिमेच्या व्रताच्या दिवशी भद्रची सावली राहणार असल्याचं म्हटलं आहे. भद्रा वटपौर्णिमेला सकाळी 11.16 ते रात्री 10:17 पर्यंत राहणार आहे. मात्र त्याचा दुष्परिणाम पृथ्वीवर होणार नाही. भद्राच्या काळात कोणंतही शुभ कार्य वर्जित मानलं जातं
वट पौर्णिमा पूजेचा पहिला शुभ मुहूर्त सकाळी 07:07 ते 08:51 पर्यंत असणार आहे. पूजेसाठी हा सर्वात शुभ मुहूर्त आहे. पूजेचा दुसरा शुभ मुहूर्त दुपारी 12.19 ते 05.31 चा असणार आहे. यंदाच्या 2023 मध्ये वट पौर्णिमा व्रताच्या दिवशी 3 शुभ योग तयार होतायत. शिव योग, सिद्ध योग आणि रवि योग हे शुभ योग आहेत.