भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयक्राईममहाराष्ट्र

मोठी कारवाई ; दहशतवाद्यांशी संबंधित १४ मेसेंजर मोबाइल अँप्सवर बंदी

मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। केंद्र सरकारने पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. १४ अँप्स सध्या बंद करण्यात आले आहेत. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी गटांकडून वापरण्यात येणारे १४ मेसेंजर मोबाइल अप्लिकेशन्स ब्लॉक केले आहेत. Cripwiser, Enigma, SafeSwiss, Vikrame, Mediafire, Briar, Beechat, Nandbox, Conion, IMO, Element, Second Line, Jangi, Threema या अँप्सचा या मध्ये समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.

यापैकी बहुतेक अँप्स युजर्स हे वेगळ्या नावाने होते. याशिवाय त्याचं डिझाइन देखील वेगळं होतं ज्यामुळे युजर्सपर्यंत पोहोचण्यात अनेक आव्हानं येत आहेत. त्यामुळेच या अँप्सला अखेर बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

अनेक एजन्सींना याबाबत माहिती मिळाली, हे App दहशतवादी संघटनेतील लोक काश्मीर खोऱ्यातील ऑन-ग्राउंड वर्कर्स (OGWs) सोबत संवाद साधण्याचं माध्यम म्हणून वापरत आहेत. मात्र ह्या App ला भारतात परवानगी नाही. भारतीय कायद्यानुसार माहिती मिळविण्यासाठी संपर्क साधता येत नाही. एजन्सींनी अनेक वेळा अँप्स व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.

भारतात हे अँप्स चालू शकणार नाहीत. त्यामुळे भारतातील माहिती शत्रू देशांपर्यंत पोहोचू शकणार नाही. याच कारणासाठी केंद्र सरकारने या अँप्स बंद केलं आहे. दहशतवादी विरोधी कारवाईत सहभागी असलेल्या एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. सुरक्षा दल आणि तपास यंत्रणांना हे अँप्स ऑपरेशनमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडून जप्त केलेल्या मोबाइल फोनवर डाउनलोड केलेले आढळले आहेत. अटक केलेल्या अनेक OGW च्या फोनवर यापैकी किमान एक अँप्स होते. त्याचवेळी तपासादरम्यान हे अँप्स पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांचा अजेंडा वाढवण्यासाठी वापरण्यात येत असल्याचेही आढळून आले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!