BIG BREAKING ; एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। महागाई सर्वोच्च स्थराला पोहोचलेली असताना महिन्याचा पहिल्याच दिवशी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. एलपीजी गॅसच्या दरात कपात करण्यात आली आहे.
एलपीजी गॅसचे दर प्रति सिलिंडर 100 रुपयांनी कमी झाले आहेत. मात्र ही कपात केवळ व्यवसायिक गॅस सिलिंडरच्याच दरात करण्यात आली आहे. घरगुती वापराच्या 14.2 किलो गॅस सिलिडंरच्या दरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. त्याच्या किमती स्थिर आहेत.