मोठी बातमी ; अजित पवार सह नऊ आमदारांना धक्का देणारा राष्ट्रवादीचा मोठा निर्णय
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। काल रविवारी राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड झाली विरोधीपक्ष नेते राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या आठ आमदारांनी देखील मंत्री पदाची शपथ घेल्याने राष्ट्रवादी मध्ये मोठी फूट पडली . दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजित पवार यांच्यासह मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या मंत्र्यांविरोधात न्यायालयामध्ये जाणार नाही अशी भूमिका घेतली होती. परंतु राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्व कायदेशीर बाबी तपासून रात्री १२ वाजे नंतर अजित पवार यांना धक्का देणारा निर्णय घेत मोठी घोषणा पत्रकार परिषदेमध्ये केली.
राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी पक्षाला कोणतीही कल्पना न देता सत्ताधारी पक्षासोबत जात मंत्री पदाची शपथ घेतली. शरद पवार यांना अंधारात ठेवत ही कृती केली त्यामुळे आम्ही संबंधित आमदारांना अपात्र करण्याबाबत विधानसभा अध्यक्षांना मेल पाठवला आहे. अध्यक्षांनी आमची बाजू ऐकून घ्यावी, विधानसभेचे अध्यक्ष यांनी लवकरात लवकर आम्हाला बोलवावं. उद्या लवकरात लवकर या पिटिशनसाठी आमची बाजू ऐकून घ्यावी यासाठी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना विनंती केली आहे.
अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या काही आमदारांनी आमच्याशी संपर्क साधला आहे. या आमदारांना माघारी परतायचं असून त्यांना भाजपसोबत जायचं नाही. बरेच आमदार परत यायचं बोलत आहेत त्यामुळे त्यांच्यावर आम्हाला अन्याय करायचा नाही. मात्र ज्यांनी शपथ घेतली आहे त्यांनी पक्षाला धोका दिल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं.