महाराष्ट्र

खाद्यतेलाच्या किमतीत मोठी घसरण, “इतक्या” रुपयांनी झाले स्वस्त

जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। आंतरराष्ट्रीय बाजारातून आयात करण्यात आलेल्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाल्याने त्याचा परिणाम खाद्यतेलाच्या किमतीवर झाला.आतापर्यंत वाढत्या खाद्यतेलाच्या किमतीमुळे गृहिणींचे किचन बजेट कोलमडून गेलं होतं. मात्र अशातच सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सोयाबीन तेलाचे ९०० एमएलचे पाऊच १४ रुपयांनी स्वस्त झाले. तर १५ किलो सोयाबीन तेलाच्या डब्याचे दर अडीचशे रुपयांनी खाली आले.

हे दर कमी हाेण्यामागे आंतरराष्ट्रीय बाजारातील पाम तेलाच्या दरातील घसरणीसोबत स्थानिक पातळीवर सर्वच तेलबियांची आवक वाढल्याचा परिणाम असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. गेल्या आठवड्यात घाऊक बाजारपेठेत सोयाबीन तेल प्रती पाऊचे दर १४२ रुपये होते. ते मंगळवारी १२७ रुपये झाले. संयुक्त कुटुंबाला जास्त प्रमाणावर लागणाऱ्या तेलाची गरज भागवण्यासाठी पंधरा किलोचा डबा घेतला जातो.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!