भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रसामाजिक

खाद्यतेलाच्या किमतीत मोठी घसरण, सर्व सामान्यांना दिलासा

मुंबई,मंडे टू मंडे न्यूज l सर्वसामान्यांना खाद्यतेलाच्या बाबतीत पुन्हा सुखद दिलासा देणारी बातमी असून खाद्यतेलाच्या किमतीत जागतिक बाजारात घसरण झाली असून अशातच केंद्र सरकारने शुक्रवारी खाद्यतेल संघटनांना जागतिक बाजाराच्या अनुषंगाने प्रमुख खाद्यतेलाची कमाल किरकोळ किंमत (MRP) प्रति लिटर 8-12 रुपयांनी कमी करण्याचे निर्देश दिले.

अन्न मंत्रालयाने सांगितले की ज्या कंपन्यांनी त्यांच्या किमती कमी केल्या नाहीत आणि ज्यांची एमआरपी इतर ब्रँडपेक्षा जास्त आहे, त्यांनाही त्यांच्या किमती कमी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. उत्पादक आणि रिफायनर्सने वितरकांना ऑफर केलेली किंमत देखील तात्काळ प्रभावाने कमी करणे आवश्यक आहे तसेच प्रमुख खाद्यतेल संघटनांना त्यांच्या सदस्यांसोबत हा मुद्दा ताबडतोब उचलण्याची आणि प्रमुख खाद्यतेलांची कमाल किरकोळ किंमत (MRP) 8-12 रुपये प्रति किलो वरून तात्काळ प्रभावाने कमी करण्याच्या सूचना देण्यात आली आहे.

खाद्यतेलाच्या किमतीत घसरण सुरूच आहे आणि खाद्यतेल उद्योगाकडून आणखी कपातीची तयारी सुरू आहे. सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्शन असोसिएशन ऑफ इंडिया आणि इंडियन व्हेजिटेबल ऑइल प्रोड्युसर्स असोसिएशनसह उद्योग प्रतिनिधी, जागतिक किमतींमध्ये सतत घसरण होत असताना खाद्यतेलाच्या किरकोळ किमतीत आणखी कपात करण्यावर चर्चा करण्यासाठी महिन्याभरात बोलावलेल्या दुसऱ्या बैठकीत उपस्थित होते.

बैठकीत मंत्रालयाने सांगितले की, आयात केलेल्या खाद्यतेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतीत सातत्याने घसरण होत आहे आणि त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेतील किंमतीही त्या तुलनेत कमी होतील याची खातरजमा करून खाद्यतेल उद्योगाला आवश्यक आहे. जागतिक बाजारपेठेतील किमतीतील घट अंतिम ग्राहकांपर्यंत जलदपणे पोहोचवा. अशा सूचना अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी केल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!