भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराष्ट्रीय

सोने-चांदीच्या किमतीत मोठी पडझड, काय आहेत आजचे भाव

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। मौल्यवान धातूत मोठी घसरण झाल्याने सोने-चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.सराफा बाजारात ग्राहकांची गर्दी झाली. पण तरीही ग्राहकांना चढ्या दरानेच दोन्ही धातूची खरेदी करावी लागत आहे. गेल्या तीन आठवड्यात किंमतीत मोठी वाढ झाली आहे. कालच्या घसरणीने त्यात ग्राहकांना हायसे वाटले. पण वाढलेल्या किंमतीमुळे ग्राहक हैराण आहेत. सोने-चांदीत अजून घसरणीची अनेक ग्राहक वाट पाहत आहेत. सोन्याने 65,000 रुपयांचा टप्पा ओलंडल्याने ग्राहक नाराज होते. त्यात किंमतीत मोठी घसरण झाल्याने त्यांना फायदा झाला. ….इतके घसरले सोने-चांदीचे भाव

सोन्याने ओलांडला 65 हजारांचा टप्पा
सोन्याने 65 हजारांचा टप्पा ओलांडला. अनेक शहरातील ग्राहकांना ऐन हिवाळ्यात या किंमती पाहून घाम फुटला. सोन्याने सातत्याने नवनवीन रेकॉर्ड नावावर केले. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 28 नोव्हेंबर, 1 डिसेंबर रोजी नवनवीन रेकॉर्ड झाले. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,728 रुपये झाला होता. 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 63,281 रुपयांवर पोहचली. तर चांदी 76,430 रुपये किलो झाली होती. काही शहरात तर चांदी 78,000 रुपयांच्या घरात पोहचली होती.

सोन्याच्या भावात पळझळ
महिन्याच्या सुरुवातीच्या तीन दिवसांत सोने 1030 रुपयांनी वधारले. या आठवड्यात 4 डिसेंबर रोजी सोन्यात 440 रुपयांची दरवाढ झाली. पण सोन्याने यूटर्न घेतला. 5 डिसेंबर रोजी सोन्यात एक हजारांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 58,000 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,260 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीतही झाली मोठी घसरण
या डिसेंबर महिन्याच्या चार दिवसांत चांदीत 1300 रुपयांची वाढ झाली. गेल्या आठवड्यात 2300 रुपयांनी चांदी चमकली होती. 5 डिसेंबर रोजी चांदीमध्ये 2 हजारांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 78,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा आजचा भाव
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 62,287 रुपये, 23 कॅरेट 62,038 रुपये, 22 कॅरेट सोने 57,055 रुपये झाले. 18 कॅरेट 46,715 रुपये, 14 कॅरेट सोने 36,438 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 74,383 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!