भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराष्ट्रीय

सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीचा दरही घसरला

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। सोने खरेदीचा विचार करणाऱ्या लोकांसाठी ही एक चांगली संधी असू शकते.सोन्याच्या दरात विक्रमी घसरण दिसून येत आहे.
गेल्या काही दिवसांत सोन्याच्या दरात तेजी दिसून येत होती. एमसीएक्स एक्सचेन्जवर आज (सोमवार) सकाळच्या सुमारास, सोन्याचा भाव घसरणीसह ट्रेड करत होता. तसेच, चांदीच्या दरातही घसरण दिसून आली आहे.

भारतात सोन्याचा दर –
भारतातील वायदा बाजारात मल्टी कमोडिटी एक्सचेन्ज अर्थात एमसीएक्सवर सोन्याच्या दरात घसरण दिसून येत आहे. आज सोन्याचा दर 59550 रुपयांवर खुला झाला. सोन्याचा दर सकाळी 11 वाजून 15 मिनिटांनी घसरणीसह 59411 रुपये प्रति दहा ग्रॅमवर आला होता. व्यापार सत्रादरम्यान हा भाव 59402 रुपयांवर आला होता. गेल्या शुक्रवारी हा दर 59527 रुपयांवर बंद झाला होता. तज्ज्ञांच्य मते सोन्याच्या किंमतीत आणखी घसरण बघायला मिळू शकते.

चांदीही स्वस्त –
चांदीच्या दरातही मोठी घसरण दिसून येत आहे. आज चांदी 72280 रुपयांवर खुली झाली. यानंतर, चांदीचा दर 426 रुपये प्रति किलोग्रॅमच्या घसरणीसह 72052 रुपये प्रति किलोग्रॅमवर व्यवहार करत होता. यानंतर तो 72026 रुपयांवर आला. यापूर्वी, शुक्रवारी चांदीचा दर 72478 रुपयांवर बंद झाला होता. तज्ज्ञांच्या मते, चांदीचा दर 70 हजार रुपयांवरही येऊ शकतो.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!