वीज दरात मोठी वाढ, प्रति युनिट द्यावे लागणार “इतके” जास्त पैसे, ग्राहकांना मोठा धक्का
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। गेल्या काही दिवसांपूर्वी देशात कोळशाचा तुटवडा निर्माण झाल्याची परिस्थिती आहे. यानंतर आता सणासुदीमध्ये महावितरणने इंधन समायोनज शुल्क आकारून पुन्हा वीज महाग केली आहे. यामुळे ऐण सणासुदीमध्ये ग्राहकांना मोठा धक्का बसला. महावितरणाच्या नवीन आदेशानुसार घरगुती ग्राहकांना सप्टेंबर बिलासाठी प्रति युनिट ३५ पैसे जास्त द्यावे लागणार आहे.
महावितरणाच्या आदेशात असे म्हटले आहे की,, महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महावितरणने सप्टेंबरमध्ये वापरलेल्या विजेवर इंधन समायोजन शुल्क वसूल करीत आहे. येत्या महिन्यापासून ही वसुली करण्यात येणार असून महावितरणाच्या आदेशानुसार परिणाम बीपीएल श्रेणीतील ग्राहकांवरही होणार आहे. यासोबत कृषी जोडणीसाठी प्रति युनिट १० आणि १५ पैसे आकारण्यात आले आहे. तसेच उद्योगांसाठी प्रति युनिट २० पैसे जास्त द्यावे लागणार आहे.
काही दिवसांपासून देशात कोळशाचा तुटवडा निर्माण झाल्याची परिस्थिती आहे, यावेळी महानिर्मितीकडे सध्या चार ते पाच दिवस पुरेल इतकाच कोळसा उपलब्ध होता. त्यामुळे जनतेला भारनियमनाचा सामना करावा लागू शकतो, असे संकेत दिले होते. तसेच नाशिक आणि कोराडी वीज केंद्र वगळता इतर पाच वीज केंद्रात चार-पाच दिवस पुरेल एवढा कोळसा आहे. त्यामुळे कोळसा खाणीत पावसाचे पाणी शिरल्यास किंवा रेल्वे्चाय तांत्रिक अडचणींमुळे वाहतुकीत अडथळा निर्माण होऊन कोळसा पुरवठा ठप्प झाल्यास महानिर्मितीला पुरेशी वीजनिर्मितीत करणे कठीण होणारी आहे.