भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

राज्यातील तापमानात मोठी वाढ, तापमानाचा तडाखा अनेक जिल्ह्यांना बसणार

मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। देशात बहुतांश भागात तापमानात मोठी वाढ झाली आहे. त्याचवेळी दक्षिणेकडील राज्यांमध्ये पाऊस पडत आहे. हवामान खात्याने म्हटले आहे की, ओडिशासह १० राज्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे, तर १७ महाराष्ट्रासह राज्यांमध्ये तापमानात मोठी वाढ होणार आहे. या आठवड्यापासून देशातील बहुतांश भागात उष्णतेची लाट सुरू होईल. गेल्या वर्षी मे मध्ये देशातील सरासरी तापमान ४३.५ डिग्री सेल्सियस होते. ते या वर्षी ३९.१ डिग्री सेल्सियस होते. परंतु त्यात वाढ होणार आहे.

कसे राहणार राज्यात तापमान
राज्यात अनेक ठिकाणी तापमानाच्या पारात चांगलाच वाढला आहे. या आठवड्याभरात कमाल तापमान ४२ ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज हवामान खात्याच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. राज्याच्या उत्तर आणि पश्चिमेकडील भागातून उष्ण आणि कोरडे वारे वाहत असल्याने अचानक तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पुढील काही दिवस तापमान जास्त राहणार आहे. मे हिटचा तडाखा अनेक जिल्ह्यांना जाणवणार आहे. जळगावात तापमान पुन्हा ४२ ते ४३ डिग्री अंश सेल्सिअसवर पोहचले आहे. काही दिवस उष्णतेची लाट अशीच राहणार असल्याने नागरिकांनी उन्हापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.


राजस्थान, उत्तर प्रदेश आणि7 मध्य भारतात तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे जाणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. राजधानी दिल्ली आणि आसपासच्या भागात पारा ४० अंशांच्या पुढे जाईल. दरम्यान, मंगळवारी राजस्थानच्या बाडमेरमध्ये पारा ४३ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला. मध्य प्रदेशात सोमवारी सहा जिल्ह्यांमध्ये पारा ४० अंश सेल्सिअसच्या वर नोंदला गेला.

राज्यात सर्वाधिक तापमान अकोल्यात
राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद अकोल्यात झाली आहे. अकोल्यात ४२ अंश सेल्सियवर तापमान गेले आहे. जळगाव ४१, वर्धात ४० अंश सेल्सियस तापमान होते. नाशिकमध्ये ३६.५ अंशांवर पारा होता. मुंबई आणि पुणे शहरातील तापमान वाढले आहे. मुंबईचे तापमान ३३.४ अंशांवर तर पुणे ३६.८ अंशावर गेले आहे.

काही प्रमुख शहरातील तापमान
जळगाव ४०
अकोला ४१
मुंबई ३३.४
पुणे ३६.८
नागपूर ३९
नाशिक ३६.५

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!