मोठी बातमी : ६ लाख आधारकार्ड रद्द, UIDAI चा कठोर निर्णय
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा।। सरकार कडे डुप्लिकेट आधार कार्डाबाबत अनेक तक्रारी येत होत्या. यावर कारवाई करत, आधार कार्ड जारी करणारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने कठोर पाऊल उचलत 5,98,999 आधार कार्ड रद्द केली आहेत.
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले की, डुप्लिकेट आधार कार्डची समस्या दूर करण्यासाठी यूआयडीएआय सातत्यानं पावले उचलत आहे. आतापर्यंत आधार कार्ड पडताळणीसाठी फक्त बोटांचे ठसे आणि डोळे वापरले जातात. आता आधार कार्डमध्ये फेस व्हेरिफिकेशनचे फिचर जोडण्यात आले आहे. म्हणजेच आता आधार कार्ड पडताळणीसाठी चेहराही वापरला जाणार आहे.
जानेवारी 2022 पासून सरकारने अशा 11 वेबसाइट्सना आधार कार्डची सेवा देण्यापासून ब्लॉक केले आहे. ते म्हणाले की यापैकी कोणत्याही वेबसाइटवर कोणत्याही नागरिकाला आधार कार्ड नोंदणी करण्याचा, बायोमेट्रिक बदलण्याचा आणि मोबाइल नंबर बदलण्याचा अधिकार नाही. ते पुढे म्हणाले की, जर लोकांना त्यांच्या आधार कार्डमधील पत्ता, मोबाईल नंबर किंवा फोटो बदलायचा असेल तर त्यांना आधार कार्ड केंद्र किंवा यूडीएआयच्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. आधारशी संबंधित सेवांचा दावा करणार्या बनावट वेबसाइट्सना यूआयडीएआय कडून नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.