शाळांबाबत मोठी बातमी, उन्हामुळे मुलांना शाळा बंधनकारक करू नका, शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l शाळांबाबत मोठी बातमी समोर आली आहे. उन्हामुळे मुलांना शाळा बंधनकारक करू नका, अस परिपत्रक शिक्षण विभागाने काढल आहे. तसेच राज्याच्या शिक्षण विभागान मोठा निर्णय घेत शाळेत उपस्थिती बाबत मुलांना सवलत द्यावी.असेही परिपत्रकात म्हटले आहे.
२२ एप्रिल पासून ही सवलत दिली जाणार असून उन्हामुळे मुलांना शाळा बंधनकारक करू नका ,त्यांना गैरहजर राहण्याची सवलत द्यावी. असा मोठा निर्णय राज्याच्या शिक्षण मंडळान घेतला आहे .उष्मा घाताचा धोका होऊ नये म्हणून हा निर्णय शिक्षण विभागान घेतला आहे.राज्यातील सर्व शाळांना आता २ मे पासून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच १५ जून पासून शाळांचे नावे वर्ष सुरू होणार आहे. तर विदर्भातील शाळा १ जुलै पासून सुरू होणार. असल्याचंही संचालकांना काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.