भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

मोठी बातमी ; शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत आज कारवाईला सुरुवात होण्याची शक्यता!

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना गटाच्या १६ आमदारांविरुद्धच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लवकरच निर्णय घेणार आहेत. एवढेच नव्हे तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर आमदारांना आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर नोटीस देण्याची शक्यता असल्याची माहिती मिळत आहे यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

उद्धव ठाकरे गटाने या आठवड्याच्या सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करुन आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर जलद सुनावणी करण्यासाठी अध्यक्षांना निर्देश द्यावेत, अशी मागणी केली आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर आमदारांना आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर नोटीस देण्याची शक्यता असल्याचे वृत्त समोर आले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शिवसेनेच्या घटनेची प्रत आपल्याला मिळाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ शिवसेना आमदारांविरुद्धच्या अपात्रतेच्या याचिकांवर लवकरच सुनावणी सुरु होणार आहे, असं राहुल नार्वेकर यांनी शुक्रवारी (७ जुलै) सांगितलं होतं.

दरम्यान, आमदार सुनील प्रभू यांनी ठाकरे गटाच्या वतीने या महिन्यात पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने ११ मे रोजीच्या निकालात विधानसभा अध्यक्षांना याचिकांवर मुदतीत निर्णय घेण्याचे निर्देश दिले असतानाही राहुल नार्वेकर हे जाणूनबुजून सुनावणीला उशीर करत असल्याचा दावा केला, याचिकेत करण्यात आला होता. तर राहुल नार्वेकर यांनी सुनावणी लवकरच घेणार असल्याचे म्हटल्यानंतर आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!