आतांची मोठी बातमी : आसाराम बापू यांना जन्मठेप
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. स्वयंघोषित धर्मगुरू आसाराम बापू यांना गांधीनगर कोर्टाने मोठा दणका दिला आहे. आसाराम बापू हा २०१३ मधील एका बलात्काराच्या प्रकरणात दोषी आढळला होता. आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गांधीनगर कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे.
काय आहे प्रकरण ?
आसाराम बापूवर उत्तर प्रदेशच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. ही मुलगी मध्य प्रदेशमधील छिंदवाडा येथे आसाराम यांच्या आश्रमात शिकत होती. या मुलीच्या आरोपानुसार, आसाराम यांनी तिला जोधपूरजवळच्या आश्रमात बोलावले होते. आणि ऑगस्ट १५, २०१३ ला तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. दरम्यान, २० ऑगस्ट २०१३ ला आसारामानी १५ ऑगस्ट रोजी एका मुलीचे लैंगिक शोषण केल्याची तक्रार दिल्लीमध्ये दाखल करण्यात आली त्यानंतर हा खटला जोधपूर कोर्टाकडे सोपण्यात आला होता. २३ ऑगस्ट २०१३ ला आसारामाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण यावर भडकलेल्या आसाराम समर्थकांची कमला मार्केट पोलीस स्टेशनमधे तोडफोड केली होती. २८ ऑगस्ट २०१३ ला पीडित मुलीच्या वडिलांनी आसारामला फाशी देण्याची मागणी केली होती.
तर दुसरीकडे मुलगी मनोरूग्ण असल्याचा दावा आसारामने केला होता. त्यानंतर २९ ऑगस्ट २०१३ ला काँग्रेस नेते मुद्दाम त्यांना लक्ष्य करून असले आरोप करत आहेत असा अप्रत्यक्ष आरोप आसारामने केला होता. ३१ ऑगस्ट २०१३ ला आसारामला जोधपूर पोलिसांनी अटक केली होती, आसारामची पोलिस कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली होती. परंतु या दरम्यान समर्थकांनी कोर्टाबाहेर गोंधळ घातला होता. नोव्हेंबर २०१३ ला जोधपूर पोलिसांनी आसाराम विरोधामध्ये आरोपपत्र दाखल केले होते. याचबरोबर आसाराम आणि चार लोकांवर बलात्काराचे आरोप करण्यात आला होता. फेब्रुवारी २०१४ ला आसारामविरोधात कोर्टात सुनावणीला सुरूवात झाली होती. ज्येष्ठ कायदेतज्ञ राम जेठमलानी यांनी आसाराम बापू यांचे वकीलपत्र घेतले होते. आसाराम बापूंना वेगळाच आजार आहे ज्यामुळे ते महिला त्याच्याकडे आकर्षित होतात असा अजब युक्तिवाद कोर्टामध्ये करण्यात आला होता.
फेब्रुवारी २०१५ ला आसाराम बापू केसमधील एक साक्षीदार राहूल सचान जेव्हा आपले स्टेटमेंट द्यायला कोर्टामध्ये चालला होता तेव्हा त्याच्यावर हल्ला करण्यात आला. त्यानंतर ८ जुलै २०१५ला दुसऱ्या एक साक्षीदार सुधा पाठक साक्षी देण्यावरून मागे फिरल्या आणि त्यांनी कोर्टामध्ये सांगितले होते की आम्हाला आसाराम बापूबद्दल काहीच माहिती नाही. १२ जुलै २०१५ रोजी क्रिपालसिंग या साक्षीदारची हत्या शहाजहानपूरमध्ये करण्यात आली होती. त्यानंतर मात्र ७ एप्रिल २०१८ रोजी जोधपूर कोर्टामध्ये दोन्ही पक्षांचे युक्तीवाद संपले आणि आज या प्रकरणावर आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.