भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयराष्ट्रीयसामाजिक

मोठी बातमी : मोठा झटका ; गॅस सिलिंडरच्या किंमतीत २०४ रुपयांची वाढ

मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। तेल कंपन्यांनी ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. आजपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात २०४ रुपयांनी वाढ झाली आहे. नवीन दर रविवारपासून म्हणजेच १ ऑक्टोबर २०२३ पासून लागू झाले आहेत. या दरवाढीनंतर मुंबईत १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर आता १६८४ रुपयांना विकला जाणार आहे.

इतर महानगरांमध्ये किमती किती वाढल्या?
कोलकातामध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत २०३.५० रुपयांनी वाढली आहे. येथे व्यावसायिक गॅस सिलिंडर १६३६.०० रुपयांऐवजी १८३९.५० रुपयांना खरेदी करावा लागणार. मुंबईत १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत २०४ रुपयांची वाढ नोंदवण्यात आली असून त्याची किंमत १४८२ रुपयांवरून १६८४ रुपये प्रति सिलेंडर झाली आहे.

तर चेन्नईमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत २०३ रुपयांनी वाढली असून येथे १६९५ रुपयांवरून १८९८ रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. दिल्लीत १९ किलोचा एलपीजी सिलिंडर १७३१.५० रुपयांना विकला जाणार आहे.

घरगुती गॅस सिलिंडरची किंमत?
महिन्याभरापूर्वी सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत २०० रुपयांनी मोठी कपात केली होती. यानंतर १ ऑक्टोबर रोजी घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. तो जुन्याच दरावर कायम आहे. १४.२० किलोचा घरगुती गॅस सिलिंडर दिल्लीत ९०३ रुपये, कोलकात्यात ९२९ रुपये, मुंबईत ९०२.५० रुपये आणि चेन्नईमध्ये ९१८.५० रुपयांना उपलब्ध आहे.

गेल्या महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत घट
सप्टेंबर २०२३ मध्ये तेल कंपन्यांनी घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी कपात केली होती. गेल्या महिन्यात १९ किलोच्या सिलिंडरची किंमत १५८ रुपये झाली होती. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाल्याने हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये खाणेपिणे महाग होऊ शकते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!