भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

मोठी बातमी : पेट्रोल-डिझेलच्या दारात मोठ्या कपातीचे संकेत

मुंबई,मंडे टू मंडे न्युज नेटवर्क। वाहधारकांसाठी लवकरच एक चांगली बातमी मिळणार असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत घट होण्याची शक्यता असल्याने वाहधारकांना
मोठा दिलासा मिळणार आहे. सरकारी तेलकंपन्यांना डिसेंबर 2023 च्या तिमाहीत घसघशीत नफा झाला आहे. हा नफा तब्बल 75,000 कोटी रुपयांच्या घरात आहे. त्यामुळे कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींत 10 रुपयांपर्यंत घट करण्यात येईल, अशी शक्यता आहे. या दरकपातीमुळे काहीसा दिलासा मिळेल अशी चिन्हं आहेत.

सरकारी घाऊक इंधनतेल विक्रेत्यांकडून एप्रिल 2022 नंतर पेट्रोल डिझेलच्या किंमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे आता तेल कंपन्यांनी किंमतींचा आढावा घेणार असल्याचे संकेत दिले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार ऑईल मार्केटिंग कंपन्यांना प्रतिलिटर 10 रुपयांचं मार्जिन मिळायची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा लाभ ग्राहकांना उपलब्ध करुन दिला जाईल असा अंदाज आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तीन ऑईल मार्केटिंग कंपन्यांना 2023-24 या आर्थिक वर्षाच्या पूर्वार्धात चांगला नफा मिळाला आहे. आर्थिक वर्ष 2022-23 च्या तुलनेत नफ्यातील वाढ 4917 टक्के एवढी आहे. 2023-24 च्या दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत दिसलेली वाढ आणखी काही काळ कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमतींवर त्याचा सकारात्मक परिणाम होणं शक्य आहे. पेट्रोल डिझेलच्या किमती वाढतात तेव्हा त्या घसघशीत वाढतात आणि कमी होतात तेव्हा मात्र अगदीच किरकोळ प्रमाणात कमी होतात असं एक निरिक्षण आहे. मात्र आता किमती पाच ते 10 रुपयांनी कमी होतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

एचपीसीएल म्हणजेच हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीला जुलै ते सप्टेंबर 2023 मध्ये 5826-96 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. कच्च्या तेलाच्या कमी किमती आणि हायर ग्रॅास रिफायनिंग मार्जिनमुळे निव्वळ नफ्याचं प्रमाण वाढलं आहे. जुलै ते सप्टेंबर याच कालावधीत भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडला 8244 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!