मोठी बातमी : ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची भाजप मंत्र्यांशी बंद दाराआड चर्चा
मुंबई,मंडे टू मंडे न्युज नेटवर्क। आताच एक मोठी बातमी समोर अली आहे. भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी भेट घेतली . वैभव नाईक आणि रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाली. बंद दाराआड काय चर्चा झाली हे समजले नसले तरी या भेटीमुळे मात्र चर्चेला उधाण आलं आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी रवींद्र चव्हाण यांची भेट घेतल्याने वैभव नाईक यांच्या भाजप प्रवेशाची मोठी चर्चा सुरू झाली. या भेटीवर मंत्री रवींद्र चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणेंना विचारल्याशिवाय कुठलाही निर्णय नाही, असे चव्हाण यांनी सांगितले. मंत्री रवींद्र चव्हाण आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.