भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराष्ट्रीयसामाजिक

मोठी बातमी! गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा मोठी कपात

मुंबई, मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। आधी व्यावसायिक गॅस सिलेंडर त्या नंतर घरगुती आणि पुन्हा व्यावसायिक गॅस सिलिंडर च्या दारात मोठी कापत करण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. आज पुन्हा एकदा गॅस सिलिंडरच्या दरामध्ये कपात करण्यात आली आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमती 157 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. नव्या दरानुसार आता राजधानी दिल्लीमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत प्रति गॅस सिलिंडर 1522. 50 रुपये इतकी झाली आहे.

केंद्र सरकारनं गेल्या मंगळवारी घरगुती वापराच्या सिलिंडरवर 200 रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे या गॅस सिलिंडरचे दर देखील 200 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. घरगुती वापराच्या 14.2 किलोच्या सिलिंडरचे सध्याचे दर 903 रुपये एवढे आहेत.

व्यावसायिक सिलिंडरचे नवे दर
दिल्लीत पूर्वी 1660 रुपयांना मिळणारं सिलिंडर आजपासून 1522. 50 रुपयांना मिळणार आहे. कोलकातामध्ये व्यावसायिक सिलिंडरची पूर्वीची किंमत 1802.50 इतकी होत. आजपासून तिथे व्यवसायिक सिलिंडर 1636 रुपयांना मिळणार आहे. मुंबईमध्ये व्यावसायिक सिलिंडरची किंमत 1640.50 रुपये एवढी होती. गॅस सिलिंडरच्या दरामध्ये कपात करण्यात आल्यानंतर आता मुंबईत गॅस सिलिंडरचे दर प्रति सिलिंडर 1482 रुपये इतके झाले आहेत. तर चेन्नईमध्ये 1852.50 रुपयांना मिळणारं सिलिंडर आता 1695 रुपयांत मिळणार आहे.

नवीन दरानुसार घरगुती गॅस सिलिंडरची किंमत
मंगळवारी केंद्र सरकारकडून घरगुती गॅस सिलिंडरच्या दरावर दोनशे रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गॅसचे दर दोनशे रुपयांनी स्वस्त झाले आहेत. नव्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये घरगुती गॅस सिलिंडरची किंमत प्रति सिलिंडर 903 रुपये इतकी आहे. कोलकातामध्ये घरगुती गॅस सिलिंडरची किंमत प्रति सिलिंडर 929 रुपये, मुंबईमध्ये प्रति सिलिंडर 902.50 रुपये तर चेन्नईमध्ये घरगुती गॅस सिलिंडरची किंमत प्रति सिलिंडर 918.50 रुपये इतकी आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!