मोठी बातमी; राहुल भट्टची हत्या करणाऱ्या दोन्ही अतिरेक्यांना कंठस्नान, सैन्याला मोठं यश
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। काल गुरूवारी काश्मीर मध्ये राहुल भट्ट यांची हत्या झाल्यानंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. त्यानंतर सैन्यदल पुन्हा एक्शन मोडमध्ये आले. आज सैन्याला एक मोठं यश मिळालं आहे. कारण राहुल भट्टची हत्या करणाऱ्या दोन्ही अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
बुडगावात महसूल खात्यात काम करणाऱ्या राहुल भट्ट या काश्मिरी पंडिताची गुरुवारी दहशतवाद्यांकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. जम्मू खोऱ्यातील बुडगाव येथे राहूल आपल्या कुटुंबासोंबत राहत होता. या हत्येनंतर तीव्र जनक्षोभ उसळला असून पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. काश्मीर खोऱ्यात पुनः एकदा काश्मिरी पंडितांना लक्ष्य केले जात आसल्याचे यातून उघड झाले आहे. तर या हत्येच्या निषेधार्थ 350 सरकारी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी आपआपले राजीनामे दिले. सर्वांनी आपले राजीनामे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्याकडे पाठवले आहेत. हे सर्व काश्मिरी पंडित पंतप्रधान पॅकेजचे कर्मचारी आहेत. सरकारी कर्मचारी राहुल भट्ट यांची दहशतवाद्यांनी हत्या केल्यानंतर खोऱ्यात त्यांना असुरक्षित वाटत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.