भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

मोठी बातमी! कोव्हीड घोटाळा प्रकरण : ईडीची मोठी कारवाई

मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। कोव्हिडं सेंटर घोटाळा प्रकरणी मोठी बातमी समोर येत आहे, अखेर सुजित पाटकर यांना ईडीनं बुधवारी रात्री उशिरा ताब्यात घेतलं आहे. थोड्या वेळात त्यांना मुंबई सत्र न्यायालयात हजर केलं जाणार आहे. सुजित पाटकर हे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्याचं मानलं जातं.

महापालिकेतील कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे. अनेक छापेमारी आणि चौकशीनंतर अखेर ईडीने सुजीत पाटकर आणि डॉ. किशोर बिचुले यांना अटक केली आहे. त्यामुळे ठाकरे गटात खळबळ उडाली आहे.सुजीत पाटकर हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे पाटकर यांच्या अटकेमुळे राऊत यांना मोठा धक्का बसल्याचंही सांगितलं जात आहे. पाटकर यांना आता कोर्टात हजर केलं जाणार असल्याची शक्यता आहे. ईडीने आज सकाळीच सुरज पाटकर यांना अटक केली आहे. त्यांना कोर्टात हजर करून त्यांच्या कोठडीत वाढ मागण्याची शक्यता आहे. महापालिकेतील कोव्हिड घोटाळ्यासंदर्भात पाटकर यांना अटक करण्यात आली आहे.

सुजर पाटकर यांनी 100 कोटींचा घोटाळा केला होता, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्या प्रकरणाची ईडीने दखल घेऊन चौकशी केली होती. या प्रकरणी सुजीत पाटकर यांची अनेकदा चौकशीही केली होती. तसेच त्यांच्या घरावर छापेमारीही केली होती. त्यानतंर अखेर त्यांना आज पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. डॉ. किशोर बिचुले यांचाही या घोटाळ्याशी संबंध असल्याने त्यांनाही अटक करण्यात आली आहे.

कोरोना काळात लाईफलाईन कंपनीने वैद्यकीय साहित्य खरेदीत घोटाळा केला होता. हा 100 कोटींचा घोटाळा होता. ही कंपनी सुजीत पाटकर यांची होती. वाढीव दरात वैद्यकीय साहित्य खरेदी करण्यात आले होते. आरोग्य क्षेत्रातील कोणत्याही कामाचा अनुभव नसतानाही लाईफलाइ कंपनीला टेंडर देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळेच ईडीने ही मोठी कारवाई केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!