मोठी बातमी! 8 हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 92 नगरपरिषदा आणि चार नगरपंचायतींच्या निवडणुकांना स्थगिती देण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला. या निवडणुकांनंतर राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका 30 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे. पूर आणि आपात्कालीन परिस्थितीमुळे सहकार विभागाने हा निर्णय घेतला आहे. सहकार विभागाच्या या निर्णयामुळे सुमारे आठ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
राज्यात सद्यस्थितीत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विस्कळीत झालेले जनजीवन आणि वाहतूक व्यवस्था तसेच, सदर परस्थिती पूर्वपदावर येण्यास लागणारा कालावधी विचारात घेता, जास्तीत जास्त मतदारांना निवडणुकीमध्ये सहभाग नोंदवता यावा यासाठी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 73 कक मधील तरतूदीनुसार शासनास प्राप्त झालेल्या अधिकारात, 250 ककवा त्यापेक्षा कमी सदस्य सांख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्था तसेच, ज्याप्रकरणी सर्वोच्च/ उच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेशीत केले आहे, अशा सहकारी सांस्था वगळून, राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका या आदेशाच्या दिनांकापासून ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर 30 सप्टेंबर 2022 पर्यंत पुढे ढकलण्यात येत आहेत, असं सहकार विभागाने आपल्या आदेशात म्हटलं आहे.