मद्यप्रेमीं साठी मोठी बातमी ; बियरबार व दारूची दुकानं सुरू राहणार रात्री इतक्या वाजेपर्यंत
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा।राज्यभरात सध्या नव्या वर्षाच्या आगमनाचा उत्साह आहे. त्यामुळे आताच सणाचा उत्साह सर्वत्र पसरलेला आहे. असं असताना राज्य सरकारने मद्यप्रेमींना खूश करणारा एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ख्रिसमस आणि नव्या वर्षाच्या सुरुवातीला मद्यप्रेमींना खूश ठेवण्यासाठी, तसेच ऐन पार्टीच्या वेळी मद्यप्रेमींची गैरसोय होऊ नये यासाठी मद्यविक्रीच्या दुकानांच्या वेळांना सूट दिली असून 24, 25 आणि 31 डिसेंबरच्या मध्यरात्री 1 वाजेपर्यंत मद्यविक्री करण्यास सरकारने परवानगी दिली आहे.
राज्य सरकारने महाराष्ट्र दारुबंदी कायद्याचे कलम 139 (1) (C) आणि कलम 143) (2) (H) (4) अन्वये नाताळ आणि नववर्षानिमित्त 24, 25 आणि 31 डिसेंबरला राज्यातील विविध मद्य दुकानं निर्धारित वेळेनंतर रात्री उशिरापर्यंत उघडे ठेवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या आदेशानुसार, विदेशी मद्य विकणारं किरकोळ विक्रीचं दुकान, उच्च दर्जाची आणि अतिउच्च दर्जाची श्रेणीवाढ मिळालेली एफएल -2 अनुज्ञप्ती, तसेच एफएळडब्ल्यू-2 प्रकारच्या दारुच्या विक्रेत्यांना रात्री उशिरापर्यंत दारु विक्रीस मान्यता दिली आहे.
तसेच बीअर बारला रात्री 12 वाजेपासून पहाटे 5 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी असेल. विशेष म्हणजे क्लबला देखील रात्री मुभा असेल. क्लबसाठी पोलीस आयुक्तांच्या परिक्षेत्राच्या व्यतिरिक्त रात्री 11.30 ते पहाटे 5 वाजेपर्यंत मुभा राहील. तर पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रासाठी रात्री दीड ते पहाटे पाच वाजेपर्यंत चालू ठेवण्यास मुभा राहील.
किरकोळ विक्रीच्या दुकानास रात्री 1 वाजे पर्यंत परवानगी
विदेशी मध्य विकणाऱ्या किरकोळ विक्रीच्या दुकानास रात्री साडेदहा ते मध्यरात्री 1 वाजेपर्यंत दुकान खुलं ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर उच्च दर्जाची किंवा अतिउच्च दर्जाची श्रेणीवाढ मिळाळेल्या दारुच्या दुकानांना रात्री साडे अकरा ते मध्यरात्री 1 वाजेपर्यंत दुकान खुलं ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. एफएलडब्ल्यू-2 प्रकारच्या मद्यविक्रेत्यांसाठी रात्री साडेदहा ते मध्यरात्री 1 वाजेपर्यंत दुकान सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
‘या’ दुकांनाना पहाटे 5 वाजेपर्यंत सूट
एफएलबीआर-2 प्रकारच्या मद्यविक्री करणाऱ्या दुकानांना रात्री साडेदहा ते मध्यरात्री 1 वाजेपर्यंत चालू ठेवण्याची मुभा असणार आहे. तर एफएल-3 (परवाना कक्ष)च्या मदिरायलायांना पोलीस आयुक्तांच्या परिक्षेत्राच्या व्यतिरिक्त रात्री 11.30 ते पहाटे 5 वाजेपर्यंत मुभा राहील. तर पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रासाठी रात्री दीड ते पहाटे पाच वाजेपर्यंत दारुच्या दुकानांना मुभा असेल.