भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

मद्यप्रेमीं साठी मोठी बातमी, सरकारच्या निर्णयामुळे मद्य पिणाऱ्यांचं टेन्शन वाढणार

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। महाराष्ट्रातील मद्यप्रेमींचं एक मोठी टेन्शन वाढवणारी महत्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील बार, लाउंज आणि कॅफेमध्ये दिलं जाणारं मद्य महागणार आहे. १ नोव्हेंबरपासून राज्यात दारू महागणार असून राज्य सरकारने VAT मध्ये ५ टक्क्यांनी वाढ केलीये. त्यामुळे येथे बसून मद्य पिणाऱ्या व्यक्तींना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.

१ नोव्हेंबरपासून राज्य सरकारने परमिट रुम सर्व्हिसवर ५ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. या आधी ५ टक्के व्हॅट आकारला जात होता. त्यात आणखी ५ टक्के वाढ केल्याने परमिट रुमवर एकूण १० टक्के व्हॅट दर आकारला जाणार आहे. परवाना शुल्कातील दरांत काही दिवसांपूर्वीच सरकारनं वाढ केली. त्यामुळे मद्यावरील दरही वाढला. अशात आता पुन्हा एकदा बार, लाउंज आणि कॅफेमधील दर वाढल्याने नागरिकांच्या खिशाला कात्री बसणार आहे.

मात्र पंचतारांकीत हॉटेलमध्ये अधिकचा कोणताही व्हॅट आकारण्यात येणार नाही. कारण अशा हॉटेल्समध्ये आधिपासूनच २० टक्के व्हॅट आकारला जातोय. त्यामुळे पंचतारांकीत हॉटेल्सच्या दरांत यावेळी कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यासह ओ्व्हर- द-काउंटरवर देखील वाढीव व्हॅट आकारण्यात येणार नाहीये.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!