भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

मोठी बातमी : लोकसभेसाठी महाविकास आघाडीचं जागा वाटप निश्चित, कोण किती जगा लढविणार?

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. लोकसभेसाठी महाविकास आघाडीचं जागावाटप अंतिम टप्प्यात आलं आहे. महाविकास आघाडीचं लोकसभेच्या 44 जागांवर बोलणी जवळपास पूर्ण झाल्याची माहिती मिळालीय,

ठाकरे गट 19 ते 21, काँग्रेस 13 ते 15 जागा, आणि शरद पवार गट 10 ते 15 जागा लढण्याची शक्यता आहे. 4 जागांवर चर्चेतून निर्णय होणार आहे. महाविकास आघाडीमध्ये 2 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अकोला आणि हातकणंगलेची जागा राखीव ठेवण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडी सोबत आल्यास अकोल्याची जागा वंचित बहुजन आघाडीसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. तर हातकणंगलेची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

जर वंचित बहुजन आघाडी सोबत न आल्यास अकोल्याची जागा काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. हातकणंगलेची जागा राजू शेट्टींसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. शेट्टी सोबत न आल्यास शरद पवार गट या जागेवर निवडणूक लढवणार आहे. जालना, हिंगोली, भंडारा-गोंदिया, अमरावती जागेचा तिढा चर्चेतून सोडवणार आहेत. भंडारा-गोंदियाची जागा काँग्रेस किंवा राष्ट्रवादी यांच्यात चर्चेतून ठरेल. तर अमरावतीची जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या चर्चेतून ठरेल.

गेल्या काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बैठक झाली होती. शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी ही बैठक पार पडली होती. मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत जागावाटपावर चर्चा झाली होती

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!