मोठी बातमी : माजी गृहमंत्री अनिल देखमुख यांना जामीन मंजूर
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. 100 कोटी वसुली प्रकरणामुळे न्यायालयीन कोठडीत असलेल्या अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर न्यायालयात सुनावणी झाली.
राष्ट्रवादीचे नेते माजी गृहमंत्री अनिल देखमुख यांना जामीन मंजूर झाला आहे. मनी लॉडरिंग प्रकरणी त्यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. तब्बल 11 महिने 2 दिवसांच्या कोठडीनंतर अखेर अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाला आहे. 2 नोव्हेंबर 2021 ला देशमुख यांना ईडीने अटक केली होती. आता आज अखेर त्यांना जामीन मंजूर झाला आहे.
ईडीने नोंदवलेल्या गुन्ह्यात अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाला असला तरी सीबीआयने त्यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यासंदर्भात ते कोठडीतच राहणार आहेत.