भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

आमदार अपत्राता प्रकरणी विधिमंडळातून मोठी बातमी..काय घडलं आजच्या सुनावणीत..

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। आमदार अपत्राता प्रकरणावर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीला आजपासून सुरूवात केली आहे. पण आमदार अपात्रतेप्रकरणाचा निकाल यावर्षी लागणं कठीण आहे. संभाव्य वेळापत्रकात कागदपत्र तपासणी, साक्ष नोंदवणं आणि उलट तपासणीचा समावेश आहे. या प्रक्रियेला किमान तीन महिन्यांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. तसंच डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशन आहे, त्यामुळे सुनावणीची शक्यता धूसर आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.


सुनावणीवेळी काय झालं?
राहुल नार्वेकर यांच्यासमोर शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणाची सुनावणी झाली. सगळ्या याचिका एकत्र चालवाव्यात अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत, असीम सरोदे, रोहित शर्मा यांनी केली. तर एकनाथ शिंदे गटातर्फे वकील अनिल सिंग यांनी या मागणीला विरोध केला. प्रत्येक याचिका स्वतंत्र चालवावी आणि आम्हाला आवश्यक वाटेल तर नैसर्गिक न्याय तत्वानुसार पुरावा घेण्याचा अधिकार द्यावा, असा युक्तीवाद शिंदे गटाकडून करण्यात आला.


विधानसभा अध्यक्ष सुनावणीचा कार्यक्रम असलेला ड्राफ्ट सगळ्या वकिलांना सुचवणार आणि त्यावर सगळ्यांची मतं घेणार आहेत. सगळ्या वकिलांना विधानसभा अध्यक्ष सुनावणीचं वेळापत्रक देणार आहेत. सुनावणीआधी मुद्दे ठरवावे लागणार असल्याचं अध्यक्षांनी म्हणलं, यावर ठाकरे गटातर्फे असं कधीच झालं नाही सांगत आक्षेप घेतला. सर्व याचिका एकत्रित करायच्या का नाही यावर १३ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.


शेड्युल १० नुसार सगळ्या याचिका एकत्र कराव्यात. याचिका एकत्र करा, अशी आमची मागणी आहे, ते का केलं जात नाही, असा युक्तीवाद ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी केला. मात्र या युक्तीवादाला शिंदे गटाच्या वकिलांनी विरोध केला. आम्हाला या क्षणी शेड्युल १० लागू होत नाही, कारण शिवसेना पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने आम्हाला दिलं आहे, असा युक्तीवाद शिंदे गटाचे वकील अनिल साखरे यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!