मोठी बातमी : पुढील वर्षी होणार महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। शिवसेना कुणाची? या प्रश्नाभोवती राज्यामधील राजकारण ढवळून निघाले आहे. परंतु आता या सत्तासंघर्षावर पुढील वर्षीच सुनावणी पार पडणार आहे. शिवसेनेने लवकरात लवकर सुनावणी घेण्याची विनंती केली आहे, पण सुप्रीम कोर्टाने त्याला स्पष्ट नकार दिला आहे. या प्रकरणावर आता १० जानेवारीला सुनावणी पार पडणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर शिवसेनेच्या प्रतिस्पर्धी गटांनी दाखल केलेल्या याचिकांवर लवकर सुनावणी व्हावी, अशी मागणी करण्यात आली होती. शिवसेनेची बाजू मांडत देवदत्त कामत यांनी सरन्यायाधीशांना विनंती केलेली की, ‘महाराष्ट्रात असंवैधानिक सरकार सुरू आहे, त्यामुळे सुनावणी लवकर घेण्यात यावी’ अशी विनंती करण्यात आली आहे.
पण याबाबत सुप्रीम कोर्टाने लवकर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. १० जानेवारी २०२३ ला घटनापीठ बसणार आहे. त्याच दिवशी या प्रकरणाची सुनावणी कोणत्या दिवशी होणार हे ठरवण्यात येणार आहे, असे न्यायालयाने सांगितले आहे. त्यामुळे राज्याच्या सत्तासंघर्षावर सुनावणी पुढील वर्षीच होणार आहे.