राजकारणातली मोठी बातमी ; …. तर राजीनामा तयार ठेवा, मुख्यमंत्री शिंदेंना दिल्लीतुन सूचना?
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडत आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण ढवळून निघाले, सुप्रीम कोर्टाचा निर्णय लवकरच येणार आणि शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार इतकंच नाही तर अजित पवार भाजप सोबत येतील आणि मुख्यमंत्री होतील आशा चर्चा सुरू आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री बदलणार असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात आहे. त्यातच दिल्लीतील भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ शिंदेसंदर्भात फारसे समाधानकारक नसल्याचे देखील बोललं जात आहे. तसेच आमदार अपात्रतेचा निर्णय आल्यास राजीनामा तयार ठेवा असं शिंदेंना दिल्लीतून सांगितलं असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.
भाजपचे वरिष्ठ नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे. शिंदे भाजपला नकोसे झाले असल्याचे देखील बोललं जात आहे. विरोधकांकडून तर मुख्यमंत्री नाराज असल्याचा दावा केला जातोय. राज्यात मुख्यमंत्री बदलाचे वारे वाहू लागल्याची चर्चा रंगली असताना राज्यातील राजकीय घडामोडींचा वेग आला आहे. भाजपच्या हालचालींना शिंदे गटांन सूचक इशारा दिला असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
भाजपने एकनाथ शिंदे यांना सोबत घेतले तेव्हा त्यांच्या अपेक्षा अशा होत्या की एक मराठा नेता आपल्यासोबत येत आहे. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातलं राष्ट्रवादी काँग्रेसचं केडर तोडून ते तिथे भाजपला मदत करतील अशी डील झाली असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र एकनाथ शिंदे ठाणे आणि पालघर याच्या पलिकडे जाऊ शकलेले नाही असे चित्र आहे. त्यामुळे त्यांच्यावर नाराजी असल्याचे बोललं जात आहे.