भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

राज्याच्या राजकारणातली मोठी बातमी ; उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज? बैठकीला गैरहजर

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्याच्या राजकारणातली एक मोठी बातमी समोर येत असून गणेशोत्सवकाळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी उद्योगपती बॉलिवूडचे सिनेस्टार सह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांच्या घरच्या बाप्पाचं दर्शन घेतलं. वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गजांनी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी बसलेल्या बाप्पाचं दर्शन घेतलं होतं. पण या संपूर्ण गणेशोत्सवाच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार हे ‘वर्षा’ बंगल्यावर गेले नाहीत. त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर पुन्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत आज आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आलीय.

राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयांमध्ये दगावलेल्या रुग्णांच्या प्रकरणावर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर आलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या दोन्ही घटनांचा आढावा घेतल्याची माहिती समोर आलीय. याशिवाय विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. या बैठकीला प्रत्येक विभागाचे मंत्री उपस्थित होते. पण उपमुख्यमंत्री अजित पवार या बैठकीला उपस्थित नव्हते, अशी माहिती समोर आली आहे.पडद्याआड काही घडतंय का? आशा चर्चांना उधाण आले आहे.

मंत्रिमंडळ बैठकीला अजित पवार गैरहजर का?
मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार हे आजारी असल्याने मंत्रिमंडळ बैठकीला गेले नाहीत. अजित पवार हे सध्या त्यांच्या देवगिरी निवासस्थानी आहेत. ते आजारी असल्याने बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. पण त्यांच्या अनुपस्थितीवरुन राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आलंय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात नाराजी?
अजित पवार हे आधी विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. पण त्यांनी दोन महिन्यांपूर्वी अचानक सत्तेत येण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीचा भलामोठा गट अजित पवार यांच्यासोबत सत्तेत सहभागी झाला. अजित पवार सरकारमध्ये सामील होणार याची कल्पना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नव्हती. त्यामुळे सुरुवातीलाच शिंदे गटाच्या नेत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर काही घडामोडी अशा घडल्या की, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात नाराजी वाढत गेल्याची चर्चा आहे.

याच नाराजीतून अजित पवार गणेशोत्सव काळात मुख्यमंत्र्यांच्या घरी गेले नाहीत. तसेच अजित पवार यांनी नाराजीतून आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजेरी लावल्याची चर्चा आहे. अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गेले नाहीत. त्यानंतर गेल्या आठवड्यात शनिवारी रात्री उशिरा एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस गेले होते. यावेळी या तीनही बड्या नेत्यांमध्ये बैठक पार पडली होती. पण त्यानंतरही अजित पवार हे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहिलेले नाहीत. अजित पवार कोणत्याही प्रशासकीय बैठकांना टाळत नाहीत. असं असताना ते आजच्या महत्त्वाच्या मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर राहिल्याने चर्चांना उधाण आलंय.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!