भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

प्रशासनराजकीयराष्ट्रीय

मोठी बातमी ; लोकसभा आणि महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका एकत्र होणार?

मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामुळे लोकसभा आणि महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका एकत्र होणार असल्याची शक्यता वर्तविली जात होती. तशात आता निवडणूक आयोगाने अधिकाऱ्यांना दिलेल्या महत्वाच्या आदेशातून देखील तसे थेट संकेत मिळत असल्याचे बोलले जात आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्तांना निवडणूक आयोगाने एक आदेश जारी केला आहे. त्यात अधिकारी तथा कर्मचार्‍यांना निवडणुकीच्या कामाशिवाय अन्य जबाबदारी न देण्याचे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील निवडणूक शाखांमधील कर्मचाऱ्यांना निवडणुकीव्यतिरिक्त अन्य कोणतीच कामे देऊ नयेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. दोन्ही निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी अधिकार्‍यांनी मतदारसंघातील स्थितीचे अहवाल तयार करण्याची तयारी सुरू केली आहे. दरम्यान, राज्यातील विधानसभा तसेच लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणुकीची पूर्वतयारी, संचलन, मतदान यंत्रांची तपासणी आणि मतदार याद्या तयार करण्याचे काम निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सुरू केले आहे.

महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभेची मुदत ऑक्टोबर २०२४ मध्ये संपणार आहे. तसेच लोकसभेची निवडणूक एप्रिल २०२४ मध्ये होणार आहे. त्यातच आता केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना कोणतीही अतिरिक्त जबाबदारी न देण्याच्या सूचना केल्यामुळे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!