भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

मोठी बातमी ; ड्रग्स माफिया ललित पाटील कडून चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। अटकेत असलेला ड्रग्स माफिया ललित पाटील याची पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली असून या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.त्यामुळे या प्रकरणात अनेक बडे मासे गोत्यात येण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच ललित पाटील याने पोलीस चौकशीत आणखी एक मोठा खुलासा केला आहे.

पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात १६ आरोपींना अटक केली आहे. आणखी काहीजण पोलिसांच्या रडारवर आहेत. पोलीस चौकशीत असं समोर आलं आहे की, २०२१ पासून नाशिकच्या शिंदे गावात एमडीचं उत्पादन सुरू होतं. दर महिन्याला या ठिकाणाहून ५० किलो एमडीची निर्मिती केली जात होती. या एमडीचा सप्लाय मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि नाशिकसह राज्यातील अन्य शहरांमध्ये केला जात होता.ड्रग पेडलर्सच्या नेटवर्कच्या मदतीने हा एमडीचा पुरवठा होत होता. यातून ललित पाटील आणि त्याचा भाऊ भूषण पाटील दर महिन्याला तब्बल ५० लाख रुपयांचा नफा कमावत होते, असं पोलीस चौकशीत समोर आलं आहे.

याच पैशाच्या जोरावर ललित पाटील हॉस्पिटलमधील कर्मचारी आणि पोलिसांना मॅनेज करत असल्याचं त्याच्या चौकशीतून उघड झालं आहे. ससूनमधील मुक्काम वाढवण्यासाठी डॉक्टर आणि पोलिसांना तो सातत्याने पैसे देत होता. ललित पाटील ससून रुग्णालयातून ड्रग्ज सिंडिकेट चालवत होता आणि ससूनच्या बाहेर जाऊन बैठका घ्यायचा, अशी माहितीही ललित पाटील ने पोलिसांना दिल्याची माहीत मिळत आहे .

दरम्यान, ड्रग्ज प्रकरणावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असताना
आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकारपरिषद घेणार असून यात मोठा खुलासा करणार असल्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!