भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

मोठी बातमी : राज्यात सहा महिन्यात मध्यावधी निवडणुका, शरद पवारांच्या आमदारांना कामाला लागण्याच्या सूचना

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची वाय बी चव्हाण सेंटर येथे महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्व दिग्गज नेते आणि पक्षाचे सर्व आमदार उपस्थित होते. या बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर खलबतं झाली. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर या नव्या सरकारचं पहिलं दोन दिवसीय अधिवेशन आहे. या अधिवेशनात सरकारची उद्या बहुमत चाचणी होणार आहे. या बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवरच ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शरद पवार यांनी आपल्या आमदारांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. यापैकी सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे हे सरकार सहा महिनेच टिकेल. त्यामुळे मध्यावधी निवडणुकांसाठी तयार राहा, अशी सूचना शरद पवारांनी आमदारांनी केली आहे.

काय म्हणाले शरद पवार?
महाराष्ट्रातील नवं सरकार, शिंदे सरकार जास्त काळ टिकू शकणार नाही. सरकार पाच ते सहा महिने टिकेल. त्यामुळे मध्यवर्ती निवडणुकांसाठी तयार राहा. विरोधी बाकावर बसणार असलो तरी मतदा संघात जास्तीत जास्त वेळ द्या.

शिंदे सरकारमध्ये नाराजांची फौज मोठी आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर ही नाराजी उघड होताना पाहायला मिळेल. त्यामुळे बंडखोर आमदार स्वगृही परतण्याची शक्यता आहे.
सरकार पडलं तर मध्यावधी निवडणुका लागतील. त्यामुळे तयारी आत्तापासून करायला लागा.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!