क्राईममहाराष्ट्र

आताची मोठी बातमी! भोसरी एमआयडीसी भूखंड घोटाळा प्रकरण ; एकनाथ खडसेंना मोठा दिलासा

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। पुण्यातील भोसरी येथील कथित एमआयडीसी भूखंड घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे जेस्ट नेते एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना मुंबई सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे त्यांचा अंतरीम जमीन कायम ठेवला आहे. या प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. ACB नं दाखल केलेल्या गुन्ह्यात २९ ऑगस्टपर्यंत कारवाई न करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहे.

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येऊन कोर्टात याची सुनावणी सुरू आहे. या प्रकरणी अटकेची टांगती तलवार खडसे यांच्यावर होती. दरम्यान, याआधी मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली होती. न्यायालयाने मंदाकिनी खडसे यांचा अंतरिम जामीन १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर मंजूर केला. नियमित जामीन अर्जावर निकाल येईपर्यंत त्यांना दिलासा मिळाला आहे. याआधी मुंबई उच्च न्यायालयाने देखील या प्रकरणी मंदाकिनी खडसे यांना दिलासा मिळाला होता.

भोसरी भूखंड घोटाळ्या प्रकरणी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्याविरोधातही सेशन्स कोर्टाने अटक वॉरंट जारी केले होते. त्यामुळे मंदाकिनी खडसे यांना अटक होणार अशी चर्चा होती. या निर्णया विरोधात खडसे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान या प्रकरणात सहकार्य करणार आणि चौकशीसाठी हजर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. यावर कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला. दरम्यान, एकनाथ खडसे यांनाही दिलासा देत कोर्टाने त्यांना देखील जमीन मजूर केला होता. याच प्रकरणात खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांची नुकतीच कारागृहातून सुटका झाली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!