आतांची मोठी बातमी! भाजप सोबत जाण्यासाठी कुटुंबातील व्यक्तीवर दबाव, शरद पवार यांनी खुलासा केल्याचा दावा
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। महाराष्ट्राच्या राजकारणात दररोज मोठमोठ्या धडामोडी घडत असताना राज्याच्या राजकारणातील ही सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सिल्व्हर ओकवर बैठक झाली. या बैठकीत शरद पवार यांनी मोठा खुलासा केला आहे.
त्यांनी असा खुलासा केला आहे की, भाजपसोबत जाण्यासाठी कुटुंबातील व्यक्तीवर दबाव आणला जात आहे. कुणाला त्यांच्यासोबत जायचं असेल तर तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे. पण राष्ट्रवादी कुणासोबत जाणार नाही, असं शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या या दाव्याने खळबळ उडाली आहे. शरद पवार यांचा रोख अजित पवार यांच्या दिशेने तर नाही ना? अशी चर्चा या निमित्ताने रंगली आहे. संजय राऊत यांनी ‘सामना’तील आजच्या ‘रोखठोक’मधून हा दावा केला आहे.