भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

मोठी बातमी : राज्यातील ९२ नगरपरिषदांसाठी ओबीसी आरक्षण लागू होणार?आज सुनावणी

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्यातील तब्बल ९२ नगरपरिषदांसाठी ओबीसी आरक्षण लागू होणार की नाही याचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. दिवसभरातील कामकाजामध्ये या प्रकरणासंदर्भातील सुनावणी आज यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळं सर्वोच्च न्यायालयाच्या या सुनावणीकडेच अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.

‘तारीख पे तारीख’
मागील काही महिन्यांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका रखडल्या असल्याचं पाहायला मिळत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अख्त्यारित हे प्रकरण असूनही त्याबाबतच्या सुनावणीची तारीख सातत्यानं पुढे ढकलली जात आहे. नगरपरिषदांसाठी ओबीसी आरक्षण आणि थेट नगराध्यक्ष पद्धत याबाबत १७ तारखेला सुनावणी होणार होती. मात्र १७ तारखेला सुनावणीसाठी 28 नोव्हेंबरची तारीख देण्यात आली. 

सर्वोच्च न्यायालानं यापूर्वीच्या निर्णयाचं पुनर्विलोकन करावं तसंच राज्यातील ९२ नगरपरिषदांमध्ये ओबीसी आरक्षण लागू करावं, अशी मागणी करणारी याचिका शिंदे-फडणवीस सरकारनं केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयानं ३६७ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील ओबीसी आरक्षण स्थगित ठेवण्याचा आदेश दिला होता. ९२ नगर परिषदांमध्ये थेट नगराध्यक्ष पदाचे आरक्षण लागू करण्यात आलं होतं. अशा परिस्थितीत केवळ ओबीसी आरक्षण लागू न होणं हे अन्यायकारी ठरेल असा सरकारचा कोर्टात दावा आहे. 

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!