भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

मोठी बातमी! ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची दोन्ही पक्षप्रमुखांकडून अधिकृत घोषणा

मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। बाळासाहेबांच्या जयंतीच्या मुहूर्तावर शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची आज युती झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेनेच्या आणि वंचितच्या वतीने युतीची घोषणा करण्यात आली आहेत. पत्रकार परिषद घेत दोन्ही पक्षांच्या प्रमुखांनी ही घोषणा केली आहे.

“आज २३ जानेवरी असून, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 97 वी जयंती आहे. मला एका गोष्टीचा आनंद होत आहे की, ज्या स्वप्नाची वाट महाराष्ट्राची जनता याआधी पाहत होती. ते आता पूर्ण होत आहे. प्रकाश आंबेडकर आणि मी आज पहिल्यांदाच एकत्र एकाच व्यासपीठावर आहोत. तसेच, पुढची वाटचाल एकत्र लढण्यासाठी या वास्तूमध्ये आलो आहोत. ठाकरे आणि आंबेडकर या नावाला एक इतिहास व पार्श्वभूमी आहे. माझे आजोबा आणि प्रकाश आंबेडकर यांचे आजोबा हे समकालीन आणि एकमेकांचे स्नेही होते. दोघांनी त्यावेळी समजातील वाईट परंपरेवर प्रहार केले. त्याच्याबद्दल आम्ही सांगण्याची काहीच आवशक्यता नाही”, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

“सध्या राजकारणात वाईट परंपरा आणि चाली चालल्या आहेत. त्याच्यावर आघात करून त्या मोडण्यासाठी त्या दोन्ही पिढ्यांचे वारसदार आणि सहकारी एकत्र येत आहोत. देशप्रथम हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. सध्या एक भ्रम पसरवला जातोय आणि नेहमी हुकमशाहीकडे अशीच वाटचाल होते. जनतेला भ्रमात ठेवायचे. नको त्या वादामध्ये अडकवून ठेवायचं आणि आपले इच्छित जे आहे, ते साध्य करून घ्यायचे. त्याच एका वैचारिक प्रदुषणातून देशाला मोकळा श्वास घेण्यासाठी, देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी, घटनेचे महत्त्व आबाधित ठेवण्यासाठी आम्ही दोघे एकत्र येत आहोत”, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले. पुढे राजकीय वाटचाल कशी असेल? आणखी पुढे काय करता येईल? या गोष्टीचा त्या-त्या वेळेला विचार करता येईल. तसेच, विचार विनिमय करून आम्ही पुढे जाऊच, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!