मोठी बातमी : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भुकंप : काँग्रेसचे १५ आमदार महायुतीत सहभागी होणार?
मुंबई,मंडे टू मंडे न्युज नेटवर्क। येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. या आधी शिवसेना त्या नंतर राष्ट्रवादी तर आता कांग्रेस फुटीच्या मार्गावर असण्याची शक्यता आहे.काँग्रेसमधील १५ आमदार महायुतीत सहभागी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तेव्हा हा राजकीय भूकंप कधी होणार केव्हा होणार याकडे राज्यांचं लक्ष लागलं आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील राजकारणात मोठ्या प्रमाणावर राजकीय उलथापालथी झाल्याचे दिसले. शिवसेनेत दोन गट पडल्याने उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला, शिंदे गटाने हातमिळवणी करून भाजप सोबत सत्ता स्थापन केली त्या नंतर राष्ट्रवादीत दोन गट पडून अजित पवार गट सत्तेत सामील झाला.आता कांग्रेसला गळती लागल्याचे चित्र आहे.
नुकताच काही दिवसापूर्वीच माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला रामराम करत शिंदे गटात प्रवेश केला . त्यानंतर वांद्रे पूर्व येथील आमदार झिशान सिद्दीकी आणि त्यांचे वडील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, आमदार झिशान सिद्दीकी यांनी आपण काँग्रेस सोडून कोठेही जात नसल्याचे सांगत चर्चांना पूर्णविराम दिला होता. दरम्यान आज पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष फुटणार असल्याची चर्चा रंगत आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार कांग्रेस मधून बाहेर पडत असलेल्या अंदारव नेत्यांना ते कांग्रेस मधून का बाहेर पडत आहेत याची कारणे शोधून त्यांना बाहेर पडू नये म्हणून त्यांची मनधरणी केली जात असल्याची माहिती मिळत आहे परंतु काँग्रेस नेते राहुल गांधी यांची न्याय यात्रा मुंबईत येण्यापूर्वीच हे पक्षांतर घडवून काँग्रेसच्या १५ नेत्यांना काँग्रेसमधून बाहेर काढण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याची माहिती समोर येत आहे.