मोठी बातमी : २२ जानेवारीला राज्यात सार्वजनिक सुट्टी
मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क। येत्या २२ जानेवारीला अयोध्येत रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे. हा सोहळा देशभरात उत्साहात साजरा केला जाणार आहे. सोहळा सर्वांना पाहाता यावा यासाठी २२ जानेवारीाल महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. केंद्र सरकारने २२ जानेवारीला केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सु्ट्टी जाहीर केली. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारनेही सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. सोमवारी म्हणजे २२ जानेवारीला सरकारी आणि खाजगी कार्यालयं, शाळा-कॉलेजला सुट्टी असेल. अनेक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे राज्यात सु्टटी जाहीर करण्याची मागणी केली होती.
२२ जानेवारीला रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुट्टी जाहीर करण्याची मागणी आमदार व नेत्यांनी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना पत्रही लिहिण्यात आलं होतं. सर्व शासकीय, निम-शासकीय कार्यालयं; शाळा, कॉलेज यांना सुट्टी जाहीर करावी अशी विनंती यात करण्यात आली होती. २२ जानेवारीला अनेक लोक रस्त्यावर उरतलील, ज्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होऊ शकते. महाराष्ट्र सरकारने यासंबंधी निर्णय घेतला नव्हता. पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नागरिकांना सणाप्रमाणे हा दिवस साजरा करा असं आवाहन केलं आहे.
देशभरात अनेक राज्यात सुट्टी
या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. २२ जानेवारीला राम मंदिर ‘प्राणप्रतिष्ठा’ सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील शैक्षणिक संस्था बंद राहणार आहेत. शैक्षणिक संस्थांनाही सुट्टी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी मध्य प्रदेशात २२ जानेवारीला शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. राज्यात दारू आणि भांग विक्रीच्या दुकानांसह सर्व प्रकारची दुकानं बंद ठेवण्याचेही आदेश दिले आहेत. गोवा सरकारने २२ जानेवारीला सर्व सरकारी कर्मचारी आणि शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी राज्यातील सर्व सरकारी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. हरियाणा सरकारनेही राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर २२ जानेवारीला शाळा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.