सर्वात मोठी बातमी ; मंत्रिमंडळ विस्तारात इतके जण घेणार मंत्री पदाची शपथ?
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। शिंदे-फडणवीस सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे शिंदे गटासह भाजपच्या अनेक आमदार आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच मंत्रिमंडळ विस्ताराबाबत एक मोठी अपडेट समोर आली असून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच करणार, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यामुळे आता नवीन मंत्रिमंडळात कुणाला संधी मिळणार याची चर्चा रंगू लागली आहे.
समोर आलेल्या माहिती नुसार १० जणांना मंत्रिपदाची शपथ दिली जाण्याची शक्यता आहे. त्यात भाजपच्या सहा व शिंदे गटाच्या चौघांना सामावून घेतले जाईल. सध्याच्या घडीला शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात सध्या एकनाथ शिंदे गटासह आणि भाजपचे २० मंत्री आहेत. यामध्ये सर्व कॅबिनेट मंत्री आहेत. विधानसभेच्या एकूण सदस्यांची संख्या लक्षात घेता आणखी २३ जणांना मंत्रिपद दिले जावू शकते.
तीन मंत्रिपदे रिक्त ठेवून विस्तारात २० जणांना संधी दिली जाईल असा तर्क होता. मात्र, भाजपच्या सहा व शिंदे गटाच्या चौघांना सामावून घेतले जाईल. भाजपचे चार जण कॅबिनेट मंत्री तर दोन जण हे राज्यमंत्री असतील, असं सूत्रांनी सांगितलं आहे.