खाद्यतेलाच्या किंमती संदर्भातील मोठी बातमी
मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। दिवाळी सारख्या सणावारांच्या काळात तेलाच्या दरांमध्येही मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तेल दरांमध्ये बदल होणार म्हणजे नेमके ते वाढणार की कमी होणार? हाच मोठा प्रश्न समोर येतो.
येत्या दिवसांमध्ये खाद्यतेलांच्या किमतींमध्ये घसरण होण्याची शक्यता आहे. भारतात ऑगस्ट महिन्यामध्ये पामतेलाच्या आयातीत ८७ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. तर, सध्या सुरु असणाऱ्या महिन्यात १० लाख टन तेलाची आयात होण्याची चिन्हं आहेत. ही एकंदर आकडेवारी पाहता तेलाचे दर कमी होण्याची चिन्हं आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलांचे दर जवळपास ४० % नी खाली आले आहेत. ज्यामुळं आता सर्वसामान्यांच्या खर्चातून काही अंशी बचत नक्कीच होणार आहे. येत्या काळात पामतेलाची मागणी वाढू शकते ही बाब लक्षात घेता सध्या त्याचीच आयात वाढवण्यात आली आहे. पुरवठा आणि साठवण वाढल्यामुळं परिणामी आता या तेलाच्या किमती खिशाला फटका देणार नाहीत यासाठी पूरक वातावरण पाहायला मिळत आहे.