भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

मोठी बातमी ! शिंदे गट भाजप मध्ये विलीन होणार? आखली जातेय पडद्याआड रणनीती?

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या तिघाडी इंजिन काम करताना दिसत आहे. एकमेकांशी पटण्यात न पटण्यात अनेक दिवस गेल्यानंतर राजकीय वर्तुळातून एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. भाजपकडून शिंदे गटाच्या विलिनीकरणाची रणनीती आखली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटातील १६ आमदारांना अपात्र ठरवल्यास भाजपने हा प्लान बी तयार ठेवल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार नुकतीच शिवसेनेच्या १६ आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी घेतली. यावेळी ठाकरे आणि शिंदे गटाच्या बाजूने जोरदार युक्तीवाद करण्यात आला. दोन्ही गटांच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर १० जानेवारी रोजी यावर निकालाची सुनावणी करण्यात येईल असे सांगण्यात आले.

जर शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्र ठरवण्यात आले तर किंवा शिंदे गटाचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे सर्व आमदार भाजपमध्ये विलीन करण्यात येतील अशी माहिती मिळाली आहे. तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने निकाल देऊन ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरवल्यास उद्धव ठाकरे गट सुप्रीम कोर्टात दाद मागू शकतो. कोर्ट यावर काय निर्णय घेईल, याकडे देखील भाजपचे लक्ष असेल.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!