सोन्याच्या किंमतीत सर्वात मोठी वाढ
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। फेडरल रिझव्र्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी अमेरिकेची मध्यवर्ती बँक या महिन्यापासून व्याजदर वाढीची गती कमी करू शकते, असे सांगितल्यानंतर आज भारतातील सोन्याचे दर वाढले आहेत. सोन्याच्या दरात 500 रूपयांची वाढ होऊन आज 24 कॅरेट सोन्याचा दर 53,770 रूपयांनी व्यवहार करत आहे. जवळपास पाच महिन्यांतील ही सर्वात मोठी वाढ आहे. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.50 टक्क्यांनी वाढ होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 53,770 रूपयांवर आला आहे. तर, एक किलो चांदीचा दर 65,440 रुपये आहे.
जागतिक बाजारात सोन्या-चांदीचे दर
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ दिसून येत आहे. स्पॉट गोल्ड $ 24.58 ने वाढून $ 1,798.05 प्रति औंस वर आहे. स्पॉट चांदी $0.28 प्रति औंस आणि चांदीचा दर $22.62 प्रति औंस वर मजबूत आहे.