भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयमहाराष्ट्र

सर्वात मोठी बातमी : अमित शहांनी केली घोषणा, राम मंदिर उद्घाटनाची तारीख ठरली

मुंबई, मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राम मंदिराच्या उद्घाटनाची तारीख जाहीर केली. त्रिपुरात एका सभेवेळी त्यांनी बोलताना म्हटलं की, अयोध्येत पुढच्या वर्षी १ जानेवारीला भव्य राम मंदिराचे उद्घाटन करण्यात येईल. यावेळी अमित शहा यांनी काँग्रेसवरही हल्लाबोल केला. अमित शहा म्हणाले की, मी २०१९ मध्ये भाजपचा अध्यक्ष होतो तेव्हा राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यावेळी राहुल बाबा दररोज विचारायचे की मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे. राहुल गांधी आज कान उघडून ऐका. एक जानेवारी २०२४ ला अयोध्येतील राम मंदिर बांधकाम पूर्ण होऊन तयार असेल.

अमित शहा यांनी काँग्रेससह विरोधी पक्षांवरही राम मंदिराच्या तारखेवरून निशाणा साधला. ते म्हणाले काँग्रेसशिवाय इतर पक्षही मंदिर कधी होणार याची तारीख विचारायचे. निवडणुकांच्या प्रचार सभांमध्येही हा प्रश्न उपस्थित केला जायचा. असंही अमित शहा म्हणाले. तसंच काँग्रेसने राम मंदिराचा मुद्दा बराच काळ न्यायालयात अडकवून ठेवला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राम मंदिराच्या उभारणीचा रस्ता मोकळा झाला होता. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराच्या बांधकामाचे काम वेगाने पुढे नेले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राम मंदिराचे बांधकाम वेगाने सुरू आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील जागेच्या वादावर निकाल देताना राम मंदिराच्या उभारणीचा मार्ग मोकळा केला होता. तसंच मशिदीच्या उभारणीसाठी केंद्र सरकारने ५ एकर भूखंड द्यावा असे आदेशही दिले होते. या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५ ऑगस्ट २०२० रोजी अयोध्येतील राम मंदिराचे भूमीपूजन केले होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!